अर्धवट बहर अबोलीचा
अर्ध्यात थांबला झोका
चिंब पावसात एकत्र भिजूनही
तू कसा राहिलास कोरडा.....
मळवट भरला उगवतीचा
वाटेतच थांबला पहाटवारा
एकत्र स्वप्नं रंगवताना
तू कसा मिटलास डोळा....
रिकाम्या ओंजळीचा हात आपला
कंदिलाच्या प्रकाशाने उजळला
दारासमोरच्या सुंदर रांगोळीत
राखेचा रंग का भरलास...
आता प्रवास उरला एकटीचा
पण त्यालाही नसे काही दिशा
मध्यान्हीची उन्हंही उतरली
सावलीसारखा तू रे का दुरावला....
योगेश फडणीस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
योगेश फडणीस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ३१ जुलै, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)