रंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १० जुलै, २०१०

रंग - हेमा लेले (अंतरंग काव्यसंग्रहातून)

आनंदाचा रंग
डोहात तरंग
मन कसे नाचते रे
होऊनी अनंग!

कमळाची मिठी
पाकळ्यांचे गात्र!
खोलवर शोधू या रे
प्रीतीचा 'श्री' रंग

विषयाची गोडी!
नव्हे! ब्रम्हानंदी टाळी...
डोहाच्या पाण्याला की रे
मोक्षाचा तरंग...