नातं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नातं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३१ जुलै, २०१०

नातं - शिल्पा केळकर ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

तशी तिची-माझी ओळख जन्मांतरीची
तिचा निर्व्याज-निष्पाप चेहराही माझा
तिचा खट्याळ-खोडकरपणा आणि
तिच्या बुद्धीमत्वाची चमकही जणू
माझ्याच मालकीची...
आता मात्र तिची मला ओळख पटते आहे
आणि तिच्या नजरेत परकेपणाही जाणवतो आहे,
माझ्यापासून वेगळे होऊ पाहणारे
माझेच 'अस्तित्व'
जणू काही माझी मलाच
नव्याने ओळख करून देते आहे!