तशी तिची-माझी ओळख जन्मांतरीची
तिचा निर्व्याज-निष्पाप चेहराही माझा
तिचा खट्याळ-खोडकरपणा आणि
तिच्या बुद्धीमत्वाची चमकही जणू
माझ्याच मालकीची...
आता मात्र तिची मला ओळख पटते आहे
आणि तिच्या नजरेत परकेपणाही जाणवतो आहे,
माझ्यापासून वेगळे होऊ पाहणारे
माझेच 'अस्तित्व'
जणू काही माझी मलाच
नव्याने ओळख करून देते आहे!
शिल्पा केळकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शिल्पा केळकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ३१ जुलै, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)