शनिवार, १५ मे, २०१०

हायकू - शिरीष पै

हायकू हा एक जपानी काव्य-प्रकार आहे... ५ ते ७ शब्दांच्या ३ ओळी.... पहिल्या व तिसऱ्या ओळीत किंवा दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत यमक जुळते.... आणि यात निसर्गातील एखादा प्रसंग प्रतीत केलेला असतो... हा झाला प्रार्थमिक आराखडा.... खरा हायकू कसा असतो/असावा हे शिरीष पै नीच त्यांच्या 'मी माझे मला' ह्या पुस्तकात लिहिले आहे...

निसर्गात सारखं काहीतरी घडत असतं. जसं आपल्या मनात एकसारखं काहीतरी घडत असतं. पण निसर्गातली एखादीच घटना मनातल्या विचारांचा प्रवाह क्षणार्धात थांबवते. विचार थांबतात तेव्हा रिकाम्या पडलेल्या मनाच्या पोकळीत ते पाहिलेलं दृश्य येऊन बसते. मनात कुठं तरी, काहीतरी, केव्हाचं तरी किंवा आताच तरी जाग होत. मनात स्थिर झालेलं ते चित्र शब्द शोधू लागतं. शब्दमय होऊ पहात. ही सगळी ह्या मनाची क्रीडा आहे. एक नेमकं हायकू- दृश्य टिपणं, त्यात स्वतःला बेमालूम मिसळून टाकणं, त्यात स्वतःला नष्ट करून टाकणं आणि मग शब्दातून केवळ दृश्य होऊन उरणं. मन थांबत, संपतं, भूतकाळ-भविष्यकाळ दूर सारून वर्तमान होतं, तेव्हाच हायकू निर्माण होतो....
बघताना मी भूतकाळात नाही, भाविशाकालात नाही. मी आहे आताच्या क्षणात. हे माझं आता असणं आणि फक्त असणं- हे जणू साऱ्या बंधनातून मुक्त होणं आहे. ह्या आता असण्यातच 'हायकू' पण आहे. हायकू लिहितेय तेव्हा मी हे आता असणंच शब्दातून पकडून ठेवतेय. मग नंतर कुणी तरी जेव्हा तो हायकू वाचेल तो ह्या आताच असेल.....

हायकू मला आवडतात ते त्यांच्या साध्या सोप्या मांडणीमुळे आणि तरीही अतिशय गहिरा, गंभीर विचार देण्याच्या त्यांच्या ताकदीमुळे.... मराठीमध्ये अजूनही कोणी हायकू लिहिले असतीलच पण मी तरी अजूनपर्यंत फक्त शिरीष पै चेच हायकू वाचलेत... अतिशय तरल आणि प्रभावशाली हायकू आहेत त्यांचे... त्यापैकी मी वाचलेले आणि मला आवडलेले काही...

एक तळ... जुनाट... स्तब्ध
एक बेडूक बुडी घेतो त्यांत
जराशी खळबळ आणि पुन्हा शांत

किती वेळा आपण अनुभवले असेल कि एरवी शांत आयुष्यात एखादी घटना / विचार / बातमी एकदम खळबळ उडवून देते आणि यथावकाश पुन्हा सर्व सुरळीत चालू होत...

इतक्या वेगाने गाडी पुढं गेली
रस्त्यावर उमललेली रानफुलं
डोळे भरून पहातही नाही आली
खरच... किती गोष्टींचा आपण आनंदच घेत नाही... नुसतेच कशाच्या तरी मागे पळत राहतो...

पायापाशी फुटली लाट
पाणी आले... गेले
मी... फक्त पहात राहिले
दुसरे आपण फार काही करूही शकत नाही....

उदास झालेलं माझ मन
इतकं प्रसन्न कसं झालं
साधं पाखरू तर बागेत चिवचिवल


उडत जाताना बगळ्यान
किंचित स्पर्श केला पाण्याला
उठलेला तरंग वाढतच गेला

५ टिप्पण्या:

  1. chanch ahe mala farach awadi pan marathi fonts madhe mazya bhawana vakt karata yet nahit mhanun waait watate Neevedidta ashyach kavita lihit ja tula mazya shubhecha -- Pramodkaka

    उत्तर द्याहटवा
  2. शिरीश्जींमुळे मराठीत हायकु चं दालन रसिकांना खुले झाले .

    अनुराधा दीक्षित,वाडा,देवगड.

    उत्तर द्याहटवा
  3. मनात उठलेले तरंग
    मोजक्या आक्रुतीबंधात ठेवुन देणे
    हे हायकुचे सफळ देणे


    ते

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान .कविता मोठीच असावी असे नाही तीन ओळीतून सहजसोपा अर्थ लक्षात येतो.हे शिरीष पै यांनी हायकू हा प्रकार मराठीत आणल्यामुळे कळला.

    उत्तर द्याहटवा